जवखेडे खालसा सोसायटी निवडनुकित भाजपचे नेते उद्धव राव वाघ यांच्या शेतकरी मंडळाचा तेरा जागेवर विजयाचा झेंडा,

0

(सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा-कासारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकित व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन आणि भाजपचे जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या शेतकरी ग्रामविकास मंडळाने तेरा ही जागेवर भाजपचा झेंडा फडकवत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक अमोल वाघ यांच्या स्वाभिमानी मंडळाचा १३-०ने दणदणीत पराभव केला.चुलत्या पुतण्याच्या अटीतटीच्या लढाईत चुलत्याने बाजी मारून पुतण्याचा एकही जागा मिळवून न देता पराभव
केला.सत्ताधारी शेतकरी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कर्जदार गटातून चारुदत्त उद्धवराव वाघ(२६६मते), संभाजी भानुदास कासार(२४९मते), बाबासाहेब गणपत सरगड(२४८मते), नजमोद्दीन बाबुलाल शेख(२४६मते), रावसाहेब रखमाजी कासार(२४५मते), नामदेव भानुदास वाघ(२४३मते), समसोद्दीन ईस्माईल शेख(२३३मते), बाबासाहेब नामदेव मतकर(२३२मते), महिला राखीव गटातून सौ. द्वारकाबाई श्रीहरी मतकर(२५६मते), सौ.नंदा खंडू कासार(२४८मते), अनुसूचित जाती गटातून शिवाजी रावसाहेब वाघमारे(२३८मते),भटक्या विमुक्त गटातून हरिभाऊ बाबुराव जाधव(२६०मते), ईतर मागासवर्गीय गटातून अप्पासाहेब अरुण वाघ(२४६मते), विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक अमोल वाघ यांच्या स्वाभिमानी मंडळाच्या पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-आंबादास कासार(२०२), पंढरीनाथ कासार(२०५), लक्ष्मण कासार(२१७), अच्युतराव रघुनाथ वाघ(२२४),प्रकाश वाघ(२१३), खाजालाल शेख(२०१),शानूर शेख(२०३),जगन्नाथ सरगड(२१४), मच्छिंद्र लांघे(२२६),पुष्पा घाटूळ(२१९),पुष्पा मतकर(२०४), काशिनाथ आव्हाड(२०४), सचिन वाघ(२१७)याप्रमाणे मते मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम देवळालीकर,आणि योगेश नरसिंगपुरकर यांनी काम पाहिले. सचिव भाउराव कासार यांनी सहकार्य केले. सत्ताधारी शेतकरी मंडळाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जवखेडे दुमालाचे चेरमन कचरू पाटील नेहुल, जेष्ट नेते पोपटराव आंधळे,माजी उपसरपंच सुरेश वाघ,अँड.लतिफ शेख,वैभव आंधळे,संभाजी वाघ,नुरमहंमद शेख,संतोष कासार, विशाल आंधळे,राजेंद्र मतकर, राधाकिसन कासार, पोपट जाधव, शाबुद्दीन शेख,मुस्ताकभाई शेख,हरिश्चंद्र आव्हाड, दगडू आंधळे,साहेबराव कासार, गोटीराम आंधळे,भागवत घाटूळ, विठ्ठल मतकर,बाळासाहेब कासार, लालुभाई शेख,रुस्तुम शेख,ज्ञानदेव ढाकणे,संतोष सरगड,भाना मतकर,रमेश कासार, संजय वाघ, दत्ता वाघ,अरुण मतकर, संजय मतकर,बालू भाउसाहेब आंधळे यांनी विषेश परिश्रम घेतले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,पो.हे.काँ. अरविंद चव्हाण, पो.काँ.मुरलीधर लिपणे,गुप्तचर शाखेचे भगवान सानप,महिला काँन्स्टेबल कोमल गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला विजयी उमेदवारांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी फोन द्वारे अभिनंदन केले आहे.भाजपचे जेष्ट नेते उद्धवराव वाघ यांच्या निवासस्थानी सर्वांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here