शिवसेना ५६ वा वर्धापनदिन शिवसेना मनमाड शहराच्यावतीने जल्लोषात साजरा

0

मनमाड : शिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने शिवसेना ५६ व्या वर्धापनदिन विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना आमदार मा. सुहासआण्णा कांदे संपर्क कार्यालय मालेगाव चौफुली येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे आदीं प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, साईनाथ गिडगे, विनय आहेर, लियाकत शेख, संजय कटारिया, सरलाताई घोगले, सौ पूजा छाजेड आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. तसेच गोरगरिबांना शिवभोजन (अन्नदान) शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, परेश राऊत, दिनेश केकाण, सुभाष माळवतकर, युवासेनेचे योगेश इमले, शहरप्रमुख अमीन पटेल,अंकुश गवळी, सचिन दरगुडे, राहील मन्सूरी, सिद्धार्थ छाजेड, निलेश ताठे, हर्षल भाबड आदींच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामीण उपजिल्हारुग्णाल येथील रुग्णांना फळ व बिस्कीट उपशहरप्रमुख दिनेश घुगे, महेंद्र गरुड, पिंटू वाघ, डॉ विनोद ठाकरे, कयाम सय्यद आदींच्या हस्ते देण्यात आले,वरील सर्व कार्यक्रमांना बाळासाहेब माळवतकर, कासीफ शेख, गणेश सांगळे, विक्की सुरवसे, ललित रसाळ, चेतन उल्हाळे, नितीन कदम, किशोर कदम, नंदू पिठे, किशोर गोसावी आदीं शिवसैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन शहरप्रमुख मयूर बोरसे, सूत्रसंचालन उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here