डॉ. भारती प्रविण पवार यांनी आज मणिपूरमधील खोंगजोम युद्ध स्मारकाला भेट

0

दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी आज मणिपूरमधील खोंगजोम युद्ध स्मारकाला भेट दिली. हे स्मारक 1891 मध्ये ब्रिटीश साम्राज्य आणि मणिपूर राज्य यांच्यात झालेल्या युद्धाचे प्रतिक आहे,या मेमोरियल कॉम्प्लेक्समध्ये जगातील सर्वात उंच तलवारीचा पुतळा आहे. 13 ऑगस्ट हा दिवस मणिपूरमध्ये दरवर्षी “देशभक्त दिवस” ​​म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये युद्धादरम्यान प्राण गमावलेल्या मणिपुरी सैनिकांना सन्मानित केले जाते.या वेळी त्यांच्या समवेत डॉ. सपम रंजन सिंग माननीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, मणिपूर सरकार हे देखील उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here