येवला : येवला शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आशा वर्कर चा तालुका कामकाज आढावा संघटनेचे राज्य अध्यक्ष आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक यांचा मार्गदर्शनाखाली तसेच येवला शहर पोलिस निरीक्षक मा.भगवान मथुरे साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते,तहसीलदार. प्रमोद हिले यांच्यासह कॉम्रेड भास्कर शिंदे किसान सभा, येवला तालुका सचिव कॉम्रेड बशीर पठाण. यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांनी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळातही अल्प मानधन.मिळत असतानाही प्रेरणादायी असे काम केले म्हणून त्यांना. सलाम असे वक्तव्य केले
राजु देसले (महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक ) यांनी आशा वर्कर चा समस्या जाणून आशा ना गावपातळीवर. दुय्यम वागणूक मिळत आहे, वेळेवर मानधन मिळावे म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे लढा उभा करू असे आश्वासन आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना दिले यावेळी राजु देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व प्रवर्तक संघटना आयटक यांनी केले
यावेळी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात आरोग्य दुवा म्हणून वाखण्या सारखे काम करत गाव कोरोना मुक्त करण्यासाठी व कोरोना ग्रस्त लोकांना सेवा देण्याचे काम खऱ्या अर्थाने निस्वार्थी भावनेने केले म्हणून कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी गट प्रवर्तक स्वाती चव्हाण,अक्कर सविता, निशिगंधा पगारे,सुनिता बैरागी ,संगीता बैरागी, सुताणे ताई आशा वर्कर वाल्हुबाई जगताप,सविता आहेर, वंदना गोसावी,रंजना कदम,रोहिणी राऊत,सविता आहीरे,सुनिता राजगुरू,उषा शिंदे,त्रिषाली भालेराव,रेखा कवडे , यांच्यासह अनेक आशा वर्कर व प्रवर्तक उपस्थित होत्या,