पेट्रोल पंप चालकांचे खरेदी बंद आंदोलन यशस्वी

0

मनमाड : आज दिनांक 31 मे 2022 रोजी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन व फामपेडा या राज्य संघटनेने संपुर्ण महाराष्ट्रात खरेदी बंद आंदोलन हे पेट्रोलियम कंपनी व शासनाचे मनमानी धोरण विरुद्ध पुकारलेले होते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे 400 डीलर यांनी यात सहभाग नोंदवत आज पेट्रोल व डिझेल ची खरेदी पेट्रोलियम कंपनी कडून केलेली नसून सदर आंदोलन हे 80% यशस्वी झालेले आहे. त्याचप्रमाणे नाशिक,धुळे व नंदूरबार येथील सुमारे 200 डीलर हे आज सकाळी 9.00 वाजेपासून मनमाड ,पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन चे डेपो समोर जमून लक्षवेधी निदर्शन केले त्यात प्रामुख्याने 2017 पासून पेट्रोलियम डीलर चे कमिशन मध्ये वाढ तातडीने करण्याची मागणी केली आहे, तसेच विस्कळीत झालेला इंधनाचा पुरवठा हा तातडीने सुरळीत करण्याची मागणी आहे तसेच दिनांक 4 नोव्हेंबर 2021 व 21 मे 2022 रोजी केंद्र शासनाने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सुमरे 10 ते 12 रुपये कमी केलेत परंतु हा निर्णय घेताना पेट्रोलियम डीलर चे होणाऱ्या नुकसानाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही त्यामुळे देशातील सर्व डीलर चे सुमारे 3000 कोटी रुपयांचे नुकसान झाले त्याची दखल शासनाने घ्यावी. दिनांक 16 जुन 2017 पासून देशात लागू केलेली दैनंदिन किंमत बदल(DPC) ह्या धोरणाचा वापर ग्राहकांना फायदा पोहचण्यापेक्षा पेट्रोलियम कंपनी त्यांचे सोयीप्रमाणे त्याचा वापर करत असल्याने ती पद्धत बदलण्यात यावी.या सर्व बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी आजचे लक्षवेधी खरेदी बंद आंदोलन नाशिक मध्ये यशस्वी झालेले आहे .यात ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता असोसिएशन मार्फत घेण्यात आली. सदर आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष श्री भूषण भोसले, माजी अध्यक्ष श्री नितिन धात्रक, उपाध्यक्ष साहेबराव महाले, सचिव सुदर्शन पाटील, सदस्य तेहसीन खान, दिनेश धात्रक,हेमचंद्र मोरे , सुजय खैरनार,डी व्ही शहा,संजय कोठुळे, विनोद बनकर,राकेश जगताप,तुषार मरसाळे, चिनुभाई शहा, संजय धोंगडे,प्रवीण महाजन पंकज कोकाटे भारत टाकेकर, शरद गुंजाळ झिया जारीवला निलेश लोंढा मोहित नानावटी अमोल शिंदे सूरज पवार वरील प्रमाणे सर्व डीलर हे नाशिक ,धुळे व नंदुरबार येथून उपस्थित होते, आपला विनीत भूषण लक्ष्मणराव भोसले
अध्यक्ष,नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here