राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन हा अहमदनगर जिल्ह्यातील

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय वेगाने महिला आयोगाचे काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना चोवीस तासात जीवे मारण्याच्या धमकीचा फोन हा अहमदनगर जिल्ह्यातून आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. नवीदिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात हा फोन अज्ञात व्यक्तीने केला होता. हा फोन मात्र नेमक्या कोणत्या कारणांमुळे आला आहे ते कारण समजू शकलेले नाही. या बाबद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना माहिती देण्यात आली आहे. या पुर्वी दोनवेळा चाकणकरांना धमकीचे फोन आलेले आहेत.पहिला फोन पुण्यातील सींहगड रोडवरील धायरी येथील चाकणकरांच्या कार्यालयात २६ डिसेंबर २०२० रोजी आला होता.त्यावेळी तुमचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी चाकणकरांनी पुणे पोलीसात गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या वेळी “तुमचा कार्यक्रम करू”अशी भाषा वापरली होती. यापुर्वी रुपालीताई चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा असताना त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका बजावली होती. माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजिनामा देउन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी चाकणकरांना संधी मिळाली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनमुळे संपूर्ण महाराष्ट्रात महिला वर्गात प्रचंड खळबळ उडाली असुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रुपालीताई चाकणकर यांनी महिला आयोगाचा कारभार स्विकारल्या नंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या प्रकरणा संदर्भात राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेतली होती म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून हा फोन केला गेला आहे याचा तपास होणे आवश्यक आहे. चाकणकरांचा वाढदिवस असल्यामुळे तर त्यांना हा विरोधी लोकांनी खोडसाळपणे फोन केला की काय अशीही चर्चा ऐकू येत आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन,स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here