मनमाड :- मनमाड जेष्ठ नागरिक संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन. गावातील
विविध सार्वजनिक मुद्यांबाबद चर्चा केली. त्यामध्ये,
१) गावाचे कोरोना मुक्तीसाठी गावातील प्रमुख नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रमुख, व्यापारी बांधव आणि प्रशासनातील अधिकारी
वर्ग, मा. पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्तिक एक बैठक घेऊन सर्वाना मान्य होईल अशी एक नियमावली तयार करून त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करणे. 2) “स्वच्छता अभियाना “ अंतर्गत गावातील सर्व पाण्याच्या जल- कुंभाची स्वच्छता करणे. ३) वाघदर्डी धरणाच्या दगडांची पिचिंग दुरुस्ती करून भविष्यातील धोका कमी करणे. ४) गावातील साफ- सफाई बाबद अधिक लक्ष देणे. इत्यादी मुद्याबाबाद चर्चा करण्यात आली मा. मुख्याधिकारी यांनी सदर मुद्यांबाबद सकारात्मक कार्यवाही करण्याचे यावेळी सांगितले. यावेळी संघर्ष समितीचे सर्वश्री राजेंद्र पारिक (अध्यक्ष), एस. एम. भाले ( सचिव), नरेंद्र कांबळे ( कार्याध्यक्ष ), समिती सदस्य आर. बी. ढेंगळे, गणपत पगारे ,रामभाऊ गवळी, डॉ. एम.डी. बहादुरे, रत्नाकर कांबळे, वसंत महाले, एस. डी. देवकर, दिलीप आव्हाड इत्यादी उपस्थित होते.