उद्योग ऊर्जा बिझनेस कट्याची८२वी व्यावसायिक मिटींग जबरदस्त,भारदस्त आणि उर्जादायी वातावरणातउत्साहात संपन्न.

0

डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-कोरोना संसर्गामुळे व्यावसायिक एकत्र येऊ शकत नाही,एकमेकांना भेटु शकत नाही.अशा परिस्थितीत उद्योग ऊर्जा बिझनेस कट्याची ८२वी मिटींग फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन झुम उत्साहात संपन्न झाली.या मिटींगला ५२व्यावसायिक हजर होते. या मिटींगचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे स्वानंद इनव्हेस्ट शेअरींग हॅपनीस इन्शुरन्स आणि इनव्हेस्टमेन्ट अॅडवायझर सौ.चित्रा राऊत यांची मुलाखत.चित्रा राऊत मॅडम यांनी उर्जात्मक आणि आपला व्यवसाय नवीन लोकांशी संवाद साधुन कसा वाढवावा या संदर्भात खुप छान माहीती दिली.वेगवेगळ्या लिडर्स मित्रांनी जबरदस्त प्रश्न विचारले,त्याला स्वानंद इनव्हेस्टमेन्टच्या केअरिंग चित्रा मॅडम यांनी त्याच आत्मविश्वासपुर्वक आणि धीरोदात्तपणे समर्पक उत्तरे दिली.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत आपला व्यवसाय पोहचविण्याच्या संधीच त्यांनी सोनच केल.चित्रा राऊत मॅडम यांनी सांगितलं की,ऐकुन घेणे हा फार महत्वाचा गुण आहे. सेल्स मध्येही अस म्हटल जात तीस टक्के बोला आणि सत्तर टक्के ऐका.ऐकुन घेतल्यामुळे आपण ग्राहकाला व्यवस्थित समजुन घेऊन योग्य वस्तु/सेवा देऊ शकतो.त्याचप्रमाणे चित्रा राऊत यांचे आर्थिक नियोजन कसे असावे याबद्दल विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी ब्रॅन्डबाॅन्ड निलेश सरांनी पाच टीप्स दिल्या.त्या म्हणजे इनोव्हेशन-आपल्या व्यवसायामध्ये नाविन्य शोधा.नेटवर्किंग-नविन माणसांना भेटा.ओळखी वाढवा.मिटींग-वेगवेगळ्या नेटवर्किंग मिटींगला उपस्थित रहा.सेकंड इन्कम सोर्स-एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे मार्ग तयार करा.काही ठिकाणी वेळ द्या. काही ठीकाणी पैसा लावु शकता तर काही ठिकाणी टॅलेंट वापरून उत्पन्न वाढवा.अशा उर्जात्मक सुचना निलेश सरांनी दिल्या.अशाप्रकारे उद्योग ऊर्जा बिझनेस कट्याची ८२वी मिटींग व्यावसायिकांची यशस्वी वाटचाल अधोरेखित करत उत्साहात संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here