पोंभुर्णा येथे स्‍व. गजानन गोरंटीवार यांच्‍या स्मृती प्रित्‍यर्थ डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,स्‍व. गजानन गोरंटीवार हे जनतेप्रती समर्पित व्‍यक्‍ती होते. जनतेची सेवा, परिसराच्‍या विकासाचा ध्‍यास घेवून ते अव्‍याहतपणे कार्यरत होते. पोंभुर्णा येथे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय उपलब्‍ध करण्‍याची मागणी त्‍यांनीच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. आज महाराष्‍ट्राला भूषण वाटावे असे वाचनालय पोंभुर्णा सारख्‍या आदिवासी बहुल भागात उभारले गेले आहे. या वाचनालयात अठरा संगणकांनी सुसज्‍ज अशी डिजीटल लायब्ररी सुध्‍दा तयार झाली आहे. या डिजीटल लायब्ररीला स्‍व. गजानन गोरंटीवार यांच्‍या सारख्‍या सेवाव्रतीचे नाव देणे हिच त्‍यांना खरी आदरांजली असल्‍याचे प्रतिपादन डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय संस्‍थेचे सचिव अनिल बोरगमवार यांनी केले, दिनांक ११ मे रोजी पोंभुर्णा येथे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात स्‍व. गजानन गोरंटीवार यांच्‍या स्मृती प्रित्‍यर्थ डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन त्‍यांच्‍या तेरवी नि‍मीत्‍त करण्‍यात आले. त्‍यांचे सुपुत्र दर्शन गोरंटीवार यांच्‍या हस्‍ते या डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय संस्‍थेचे प्रकाश धारणे, ईश्‍वर नैताम, विनोद देशमुख, अजित मंगळगिरीवार, अजय मस्‍की, दिलीप मॅकलवार, रजिया कुरेशी, वैशाली बल्‍लमवार, रूषी कोटरंगे, गजानन मडपुवार, चरणदास गुरनुले, अमन कटकमवार, राजु ठाकरे, महेंद्र कामीडवार, विनोद कानमपल्‍लीवार, बंडुजी बुरांडे, संतोष पेंदोर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.स्‍व. गजानन गोरंटीवार यांनी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन निरंतर जनसेवा केली आहे. त्‍यांच्‍या निधनाने या तालुक्‍यातील भाजपाचा आधारवड कोसळला असुन राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्‍याची भावना जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार यांनी व्‍यक्‍त केली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेत़त्‍वात पोंभुर्णा शहर व तालुक्‍याचा जो अभुतपुर्व विकास झाला त्‍यात गजानन गोरंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याची महत्‍वपूर्ण भुमीका राहील्‍याची भावना सुध्‍दा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. यावेळी दोन मिनीट मौन पाळुन गजानन गोरंटीवार यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here