सिटीझन वेल्फेयर असोसिएशन बदलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासकांची भेट

0

बदलापूर दि. 11 मे.बदलापूरकरांच्या विविध आणि महत्वाच्या मागण्यांच्या निवेदनासंदर्भात आज असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी *मा. पालिका प्रशासक श्री दीपक पुजारी* यांची पालिका कार्यालयात भेट घेतली. प्रशासकांशी मुख्य चर्चा केल्यानंतर प्रशासकांच्या वतीने प्रशासकांच्या सचिव सौ. नारकर यांनी असोसिएशनच्या विविध मागण्याविषयी सभागृहात चर्चा करून महत्वाचे मुद्दे नमूद करून घेतले.
यावेळी बदलापूरमधील कोविड काळातील आरोग्य व्यवस्थापन यावर बोलताना असोसिएशनचे सदस्य आणि जेष्ठ सल्लागार *श्री दिलीप नारकर* यांनी कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जास्तीच्या लसींची मागणी शासनाकडे करावी अशी सूचना केली. यावेळी पालिका प्रशासनाने तयारीचा भाग म्हणून डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफची रिकृटमेन्ट आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून सर्व तयारी केली असल्याचे सांगितले पण लसींच्या पुरवठ्याअभवी हतबलता असल्याची खंत व्यक्त केली.स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंद असल्यानेपारंपरिक पद्धतीने मृतकांचे अंत्यविधी लाकडांच्या चितेवर करताना लाकडांचा अपुरा पुरवठा आणि पालिका प्रशासनाकडून प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीत पैसे घेतले जात असून करदात्या नागरिकांना पुन्हा पैसे भरायला लागतात या मुद्द्याकडे असोसिएशनचे *सरचिटणीस श्री राजेंद्र नरसाळे यांनी लक्ष वेधले. पालिका कार्यक्षेत्रातील खाजगी नॉन कोविड रुग्णालये कोविड उपचार करून लोकांची लूट करत आहेत त्यांचे ऑडिट करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच या रुग्णालयातून दिली जाणारी भरमसाठ बिल्स याकडेही पालिकेने लक्ष द्यावे असे सदस्य श्री गुरुनाथ तिरपनकर यांनी सुचवले. यावेळी उत्तरादाखल पालिकेकडून खाजगी कोविड रुग्णालयांसाठी आदर्श दरपत्रक जारी केलेले असून त्यापेक्षा जास्तीची दर आकारणी करणाऱ्या हॉस्पिटल्सच्या बिलांचे ऑडिट करून ती बिले कमी करून देण्याची सुविधा पालिकेत आहे असे प्रशासकांच्या सचिवांनी सांगितले. पालिका कार्यक्षेत्रात फक्त 12 मजली इमारतीं बांधण्याची परवानगी असताना त्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारती कशा उभ्या केल्या जात आहेत आणि याकडे डोळेझाक करणाऱ्या नगर अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी का केली जाऊ नये असा सवाल श्री दिलीप नारकर यांनी उपस्थित केला.
पालिका प्रशासनाने खाजगी कोविड हॉस्पिटल्सना जारी केलेले आदर्श दरपत्रक त्या त्या हॉस्पिटलमध्ये डिस्प्ले केले जावे म्हणजे रुग्णांची लूट थांबेल असे मत *सदस्य श्री महेश सावंत* यांनी मांडले. कोविड काळात प्रशासन गुंतल्याचे पाहून शहरातील बऱ्याच फुटपाथवर अनधिकृत पक्की बांधकामे केली गेल्याचे डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच यावर धडक कारवाई करून ती तोडण्यात यावी अशी मागणी केली. तसेच बदलापूरला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असून दररोज हजारो लिटर्सची *पाणी चोरी दिवसाढवळ्या पाणी माफियांकडून टँकर्समधून होत असून त्याबाबत पालिका काहीच कारवाई का करत नाही असा सवाल डॉ. गोईलकर यांनी उपस्थित केला.यावेळी हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक सौ. सुवर्णा इस्वलकर सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे उपाध्यक्ष, स्थानिय लोकाधिकार समितीचे जीपीओचे पदाधिकारी, बुलढाणा संपर्क प्रमुख *श्री. विलास हंकारे* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रशासक सचिव सौ. नारकर यांनी सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक चर्चा केली, मुख्य प्रशासकांना असोसिएशनचे निवेदन सुपूर्द करण्याबाबत आश्वासक प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here