सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील चारणा नदीवर बनलेल्या पुलाचा कठडा तुटल्याने ट्रॅक्टर नदीत कोसळले व बाजूला उभी असलेली शेतकऱ्याची बैलगाडी वाहून गेली .
गेल्या काही वर्षांपूर्वी साली चारणा नदीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 2 पुलांचे कामे करण्यात आली. त्यात देऊळगाव बाजार – आमठाणा या रस्त्यावर 40 मी.रुंदीच्या पुलाला असलेल्या पुलाला संरक्षक भीतीचे कामही करण्यात आले होते. परंतु 2 – 4 वर्षातच सदरील पुलाचा कठडा नदीच्या पुराणे तुटला असून यात उभे असलेले ट्रॅक्टर नदीत कोसळले व शेतकऱ्याची बैल गाडीही पुरात वाहून गेली. व पुलाची पूर्ण माहिती असेलेले फलक सुद्धा खाली पडले असून
सदरील कठडा तुटल्याने पूरस्थिती अशीच राहिल्यास मुख्य रस्ता केंवाहि बंद पडू शकतो.
म्हणून सदरील कामाची तात्काळ चौकशी होऊन संरक्षक भिंत बनवण्यात यावी व बैल गाडी वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांला नुकसानभरपाई मिळावी अशी चर्चा गावकऱ्यामध्ये सुरू होती,