मनमाड :श्री. स्वामी समर्थांनी आदेश केला म्हणून या भव्य अशा सभामंडपाचे, म्हणा किंवा मतदार संघाच्या विकासाचे काम करू शकलो. तुम्ही विश्वास ठेवला आणि स्वामींच्या कृपेने माझ्या माता -भगिनींची पाण्याची अडचण करंजवन पाणी योजनेच्या,तर तरुण बांधवांच्या नोकरीचा प्रश्न एमआयडीसी च्या माध्यमातून सोडवू शकलो. असाच विश्वास कायम ठेवा.! मनमाडचे नाव देशात उंचावेल.असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले.
. शहरातील दत्त मंदिर आवारातील श्री. स्वामी समर्थ केंद्रासाठी सभामंडपाची गेल्या कित्येक वर्षाची सेवेकऱ्यांची मागणी होती.काही महिन्यापूर्वी येथील प्रमुख सेवेकऱ्यांनी ही मागणी आमदार श्री. कांदे यांच्या कानावर घालताच, येथे नगर परिषद नगरोथान योजनेअंतर्गत सुमारे ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून भव्यदिव्य सभामंडप बांधण्यात आला.त्याचे व
त्याच बरोबर गवळी समाज बांधवांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक ९ मधील लक्ष्मी माता मंदिर सभामंडप व गवळी समाज स्मशानभूमी संरक्षक भिंत या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास कांदे व समाजसेविका सौ. अंजुम कांदे यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आ. कांदे बोलत होते.
. कर्ता करविता स्वामी आहे. आपण सर्व त्यांच्या आदेशाचे पालन करत असतो. त्यांनी आदेश दिला. प्रेरणा दिली. म्हणून मी ही कामे करू शकलो.येत्या महिनाभरात शहरातील प्रत्येक घरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड -करंजवन योजनेच्या माध्यमातून २४ तास पाणी उपलब्ध होईल.या शहरातील जेष्ठ नागरिक,माता -भगिनी, विद्यार्थी, तरुण बांधव यांच्यासाठी मी जे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी स्वामींनी ताकद द्यावी. अशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आशीर्वाद दया.! असे आमदार सुहास कांदे शेवटी म्हणाले. दरम्यान यावेळी येथे उपस्थित सेवेकरी बालिका दिव्या किशोर परदेशी हिला मदत म्हणून इतर सेवेकऱ्यांनी सायकल भेट केली असता, आमदार सुहास कांदे यांनी ही तत्काळ रोख ११ हजार रुपये दिले. व येत्या पंधरा दिवसात घरकुल बांधून देण्याचा शब्द दिला. तेव्हा दिव्या परदेशी च्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
. यावेळी मुख्याधिकारी शेषराव चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, अल्ताफबाबा खान,राजाभाऊ पगारे ,सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, बबलू पाटील,महेंद्र शिरसाठ,गंगादादा त्रिभुवन,कैलास गवळी, दिलीप तेजवानी, अमजद पठाण,आझाद पठाण, अमीन पटेल, रदे राकेश लालवानी, दत्तूदादा ताटे, दहीहंडी, विठ्ठलआप्पा,दहीहंडी, रामभाऊ नामा गवळी, वसंत गवळी, संजय नामा गवळी, सुनील गवळी, राम नीस्थानी, संतोष गोडाळकर, घुले टीसी, बाळू घुले, नागू घुले, बाप्पा धोकडे,भीमा गवळी, अंकुश गवळी, संगीता बागुल, विद्या जगताप, रूपाली पगारे, संगीता पाटील, संगीता सांगळे, पूजा छाजेड, योगेश इमले, आसिफ शेख, स्वराज देशमुख, मुकुंद झालटे, लोकेश साबळे, मिलिंद पाथरकर, संतोष सानप, निलेश ताटे, दिनेश घुगे, पप्पू घुगे, मुन्नू शेख, एजाज शहा, लाला नागरे, ऋषींकांत आव्हाड, लोकेश साबळे, शशी सोनावणे, कैलास गोसावी, अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, अमोल दंडगव्हाळ, विकास वाघ, ललित रसाळ, गोकुळ परदेशी, निलेश व्यवहारे, आदीसह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी च्या पदाधिकारी, रिपाई चे पदाधिकारी व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी, नागरिक उपस्थित होते. महेंद्र वाघ, प्रवीण भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
.