अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ४८ लोकसभा मतदारसंघात खासदारकीची निवडणुक सुरू आहे.राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही मतदारसंघात कुणालाही गाव बंदी करता येणार नाही असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोरपणे कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिला आहे .त्या बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कोणत्याही गावाला गाव बंदी करता येणार नाही.जिल्ह्यात गाव बंदीचे कुठलेही फलकही लावता येणार नाही.अशा प्रकारचे फलक कोणत्याही गावात असतील तर ते त्वरित हटवण्यात यावेत.न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्यास कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्याची तातडीची बैठक घेऊन वरील निर्देश देण्यात आले आहेत.या बैठकीस बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,अप्पर जिल्हाधिकारी डॉ त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या सह जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक उपस्थित होते.हा नियम जरी बीड जिल्ह्यातील बैठकीत सांगितला गेला असला तरी तो संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मतदारसंघात लागू होत आहे.कोणत्याही व्यक्तीला गाव बंदी केल्यास गाव बंदी करणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ संबंधित पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यात यावी अशा सूचना सर्वत्र देण्यात आल्या आहेत.असे जिल्हाधिकारी यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे .