अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”/ अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर ) भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रेत जास्तीत जास्त पोलिस देउन चोरांचा बंदोबस्त करु अशी ग्वाही पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली.ते श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराज गडावर बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या प्रशासकिय यात्रा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेवगाव -पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते हे होते.एकूण पंचाहत्तर पोलिस आणि पाच अधिकारी यांचा बंदोबस्त दिला जाईल परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देवस्थानने जास्तीत जास्त होमगार्ड किंवा खाजगी संघटनांचीही मदत घ्यावी असे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले.नवनियुक्त तहसीलदार उद्धव नाईक यांनी ही यात्रा कुठलेही गालबोट लागू न देता यशस्वी रित्या पार पाडली जाईल असे आश्वासन दिले. शेवगाव पाथर्डी तालुक्याचे उत्पादन शुल्क अधिकारी जाधव साहेब यांनी सांगितले की यात्रा काळात कुठल्याही ठिकाणी अवैधरित्या दारूविक्री आढळून आल्यास मोबाईल फोनवर कळवा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.प्रांताधिकारी प्रसाद मते साहेब यांनी यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यावसायिक दुकानदारांना शिस्त लावण्यासाठी त्यांना जागा ठरवून दिली पाहिजे.आपण येणाऱ्या भाविकांची कशी व्यवस्था करतो या वरच गावाचं नाव दुरवर पसरले जाते.या यात्रा नियोजन समितीच्या बैठकीत पिण्याचे पाणी, तिसगाव व निवडुंगे रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पशुहत्या बंदी, व्यवसायिकांना रस्ता सोडून जागा द्या, पार्किंग व्यवस्था, लाईट व्यवस्था,मोबाईल टॉवर नेटवर्किंगचे योग्य व्यवस्थापन, परिवहन,फिरते सौचालय, विहीरीत पाण्याचे टॅंकर सोडावेत, एकेरी वाहतूक व्यवस्था, आणि जादा सिक्युरिटी या विषयावर चर्चा झाली.आणि भट्टीचा सण ११ मार्च,तेल लावणं १४मार्च,कळस उतरवणे १६ मार्च,कळस चढविणे १९ मार्च,मानाची होळी २४मार्च, रंगपंचमी ३०मार्च, मुक्तद्वार दर्शन ५ते७ एप्रिल,फुलोरबाग यात्रा ८ एप्रिल, गुढीपाडवा ९ एप्रिल या दिवशी जास्त प्रमाणात गर्दी होणार आहे.या बैठकीस गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, महावितरणचे जाधव,हितेश ठाकुर, धर्मदाय आयुक्तचे सुरेश कैतके, आरोग्य अधिकारी घुगे,होडशिळ, एस टी महामंडळाचे पटेल, दारुबंदीचे रमेश घोरपडे, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार विश्वस्त, विलास मढीकर, अर्जुन शिरसाठ, शामराव मरकड, भाऊसाहेब मरकड,विमल मरकड,बबनतात्या मरकड, रविंद्र आरोळे, बाबासाहेब मरकड, रमाकांत मडकर,भानुविलास मरकड, पोपट घोरपडे, चंद्रकांत पाखरे, पल्लवी बर्हाटे, व्रुद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पालवे हे आवर्जून उपस्थित होते.शिवजीत डोके आणि तानाजी धसाळ हे विश्वस्त मात्र गैरहजर होते.