दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार, नाफेड संस्थेचे संचालक,एनसीसीएफ चे संचालक आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव यांच्या उपस्थित आज दिल्ली येथे बैठक पार पडली.केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष जी गोयल निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्क यावर पुन्हा एकदा फेर विचार करून कमी करण्यात यावे अशी विनंती बैठकीत केली यावेळी मन मी माननीय पियुषजी गोयल यांनी यावर सकारात्मता दर्शवत यावर उच्चस्तरीय कमिटीत सदर विषय ठेवण्यात येईल असा खुलासा केला. तसेच शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून,नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार कडून परवानगी देण्यात आली आहे.कांदा उत्पादन शेतकरी व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापारांनी लिलाव बंदी चा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी केंद्र सुरु करावे असे आवाहन, विनंती डॉ. भारती पवार यांनी केले.