५० दिवसात आरक्षण न दिल्यास ५५व्या दिवशी अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल, नेवाशातील धनगर समाजाचा सरकारला ईशारा

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) येणाऱ्या ५० दिवसात धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास ५५ व्या दिवशी अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल असा ईशारा नेवाशातील चक्का जाम आंदोलना प्रसंगी धनगर समाजातील नेत्यांनी सरकारला दिला आहे.धनगर आरक्षणासाठी चोंडी येथे झालेल्या उपोशनार्थीना सरकारने पन्नास दिवसाचे लेखी आश्वासन दिले आहे. नेवासा फाटा येथे नगर-औरंगाबाद (संभाजी नगर) रस्त्यावर राजमुद्रा चौकात आरक्षणासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रथम अहिल्यादेवीच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून प्रचंड घोषणाबाजीचा आक्रोश करत चक्का जाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली. नेवासा रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चा थेट राजमुद्रा चौकात धडकला. तेथे पोलीस संरक्षणात रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. मोर्चातील कु. श्रावणी कर्डिले, आणि प्रगती खर्जुले या शालेय विद्यार्थीनींनी सरकारने एसटी आरक्षणाचे दाखले देऊन आमचे भविष्य घडवावे असे आवाहन केले.यावेळी पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील विरभद्र मंदिरात धनगर समाज आरक्षणासाठी बसलेले उपोशनार्थी राजूमामा तागड यांचाही नेवासा तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सर्व रहदारी ठप्प झाल्यामुळे आंदोलन स्थळावर नेवाशाचे नायब तहसिलदार चांगदेव बोरुडे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी हजेरी लाउन आंदोलका कडून निवेदन स्विकारले आणि वाहतुकीसाठीचा रस्ता खुला करून दिला. यावेळी मंडल अधिकारी सरीता मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक सुरेश शिंदे, मनोज लोंढे, संदिप ढाकणे,मनोज अहिरे,पो.काँ.वैद्य,यांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक शाखेचे किरण गायकवाड व बाबासाहेब दहीफळे यांनी वाहतूक सुरळीत केली.मुकिंदपूर येथील मराठा महासंघ,मराठा सुकाणू समिती आणि ग्रामस्थांनी धनगर आरक्षणास पाठिंबा दिला.धनगर आरक्षणाचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथेही धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आता आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here