दिल्ली : माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य /केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बैठकीत भाग घेतला ज्यामध्ये काही देशांमध्ये अलीकडे वाढलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहीम प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.सर्व गरजूंना उपचार,औषधे आणि पायाभूत सुविधांची योग्य उपलब्धता तसेच कोविड-19 रोगाचे नियंत्रण करण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला.
यावेळी राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते.
कोविड व्हेरियंट नवा असला तरी कोविड व्यवस्थापनासाठी चाचणी-माग -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी चाचण्यांचा दर त्वरेने वाढवण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली. या चाचण्यांमध्ये आरटी- पीसीआर(RT-PCR) चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला होता. आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जागतिक कोविड -19 परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून 2022 मध्ये “कोविड-19 च्या संदर्भात “काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या कार्यवाहीची मार्गदर्शक तत्त्वे” जारी केली आहेत; ज्यात नवीन सार्स-कोव्ह-2,(SARS-CoV-2) प्रकारातील संशयित आणि संसर्ग झालेल्या रुग्णांचा लवकर शोध घेणे,विलगीकरण, चाचण्या आणि वेळेवर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
माननीय पंतप्रधान,केंद्रीय आरोग्य मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली सुयोग्य वेळेवर झालेल्या आढावा बैठकीबद्दल सर्व राज्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड-19 च्या प्रभावी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी ते केंद्रासोबत काम करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ते दक्ष आहेतच आणि सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.काही राज्यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीसाठी दक्षतेची तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्याचे आश्वासनही दिले.या बैठकीला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.
Home Breaking News राज्य /केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी...