सामुंडी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प त्रंबकेश्वर येथील सामुंडी विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती. श्र्वेता गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली टाकेहर्ष अंगणवाडी येथे पोषण अभियान निमित्ताने गणेशोत्सव पोषणोत्सव कार्यक्रमांतर्गत सामुंडी व टाकेदेवगाव विभागातील अंगणवाडी सेविकांची पौष्टिक मोदक स्पर्धा घेण्यात आली.. तसेच किशोरी मुले मुली यांची ही पैष्टिक पाककृती स्पर्धा घेण्यात आली.. पोषण माह 2022 बाबत अंगणवाडी ताईंना मार्गदर्शन करण्यात आले.. यावेळी किशोरीमुलींनी पोषणगुढी उभारली होती.. CBE कार्यक्रम गरोदर नोंदणी व प्रवेशोत्सव घेण्यात आला.. उत्कृष्ट पाककृती बनविणाऱ्या किशोरींना पोषण टोपली बक्षिस म्हणून देण्यात आली.कार्यक्रमास अंगणवाडी ताई, आशा, किशोरी, महिला बचत सदस्य उपस्थित होते.
सामुंडी विभाग, प्रकल्प त्रंबकेश्वर, जिल्हा नाशिक.