अपहरण झालेल्या मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात द्या आणि नेवाशाच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा – आमदार गोपिचंद पडळकर

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आंतरवाली येथील धनगर समाजाच्या मुलीचे अपहरण झाले असुन तीला तीच्या आई-वडीलाकडे सुखरूप सुपुर्द करा आणि मुलीच्या आई-वडीलांना अश्शील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कडून एक लाख पंचवीस हजार रुपये वसुल करणाऱ्या नेवाशाच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा अशी मागणी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रुहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या कडे केली आहे.मुलीचे आजोबा जानकू रामभाऊ कोकरे रा.आंतरवाली ता.नेवासा,जिल्हा अहमदनगर यांनी झालेला सर्व प्रकार नेवासा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितला.यामध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यासाठी एका दैनिकात पीत पत्रकारिता करणाऱ्या कुकाण्याच्या एका दलाल पत्रकारांचा ही समावेश आहे.अपहरण झालेल्या मुलीला लवकर आई वडिलांच्या ताब्यात न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा आमदार पडळकरांनी दिला आहे.या बाबद मुलीच्या वडिलांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०३७९/२०२२ कलम ३६३ प्रमाणे मुलीच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी स्पेशल क्राईम रिपोर्टर, सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here