काळ म्हणजे भुत,भविष्य, वर्तमान नव्हे तर प्रातःकाळ, मध्यानकाळ आणि अंतकाळ हे काळाचे तीन प्रकार आहेत – ह.भ.प.चंद्रकला भांबर्डेकर

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण विश्वाला शाळेत गुरुजींनी शिकवलेले काळ म्हणजे भुतकाळ, भविष्यकाळ,आणि वर्तमानकाळ हे तीन काळ आहेत पण खरे काळ म्हणजे प्रातःकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे खरे काळाचे खरे प्रकार आहेत अशी माहिती ह.भ.प.चंद्रकला भांबुर्डेकर (औरंगाबाद)यांनी दिली त्या स्व.अर्जुन राव लोणारे यांच्या प्रथम पुंण्यस्मरणा निमित्ताने वाघोली येथे झालेल्या किर्तनसेवे प्रसंगी बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.भालसिंग महाराज, ह.भ.प.विठ्ठल आबा गव्हाणे(आळंदी), ह.भ.प. संजय शिंदेसर उपस्थित होते.वाघोली-कामतशिंगवे पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांना ह.भ.प.चंद्रकला भांबुर्डेकर यांनी आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध केले.रामायण, महाभारत, या पौराणिक कथेतील अनेक उदाहरणे देऊन उपस्थित श्रोत्यांना भावना विवश केले. स्व.अर्जुनराव लोणारे हे सामाजिक कार्यकर्ते होते. परंतु कोरोणाग्रस्त रुग्णांची सेवा करता करता अर्जुनरावांना आपला जीव गमवावा लागला. ही गावाच्या आणि समाजाच्या द्रुष्टीने फार मोठी हाणी झाली आहे. गावातील ग्रामस्थांनी स्व.अर्जुन रावांच्या ज्योती आणि स्वाती या दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलून या कुटुंबाला हातभार लावला आहे. ह.भ.प. सौ. चंद्रकला भांबुर्डेकर यांनी ही या उध्वस्त झालेल्या कुटुंबातील व्यक्ती साठी ग्रामस्थ सांगतील ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवीली आहे.मुलींचे चुलते भिमराव लोणारे यांनी ही आपल्या बंधुची पत्नी श्रीमती अनिता,कु.दिपाली आणि क्रुष्णा या चिमुकल्या व्यक्तींना पुर्ण आधार दिला आहे.कोरोणामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबाला आधार देऊन एक सामाजिक बांधिलकीचा संदेश ह.भ.प. चंद्रकला भांबुर्डेकर यांनी समाजाला दिला आहे. या प्रसंगी ज्ञानेश्वर लोणारे, जालिंदर लोणारे, बाबासाहेब लोणारे, दिलिप लोणारे,बापुराव धनगर, शेषराव नाकाडे,पवार साहेब, दिलिप कुर्हे,जगदीश जमधडे,रावसाहेब जाधव,शिवाजी जाधव,उत्तम ब्राम्हणे,दिलिप शिंदे, कांबळे सर यांच्या सह विविध संस्थेचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here