जवखेडे दुमाला सोसायटीच्या चेरमनपदी कचरू नेहुल तर व्हाइस चेरमनपदी रमेश नरवडे यांची बिनविरोध निवड

0

अहमदनगर : (सुनिल नजन अहमदनगर) बहुचर्चीत आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमनपदी भारतीय जनता पार्टीच्या भैरवनाथ शेतकरी मंडळाचे नेते कचरू कारभारी नेहुल तर व्हाइस चेरमनपदी रमेश कारभारी नरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पाथर्डी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात चेरमन आणि व्हाइस चेरमन पदासाठी एक-एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी.पारधे साहेब यांनी दोन्ही पदाच्या निवडी जाहीर केल्या.चेरमन पदासाठी कचरु नेहुल यांच्या नावाची सुचना संचालक भास्कर नेहुल यांनी मांडली आणि आदिनाथ गीरी यांनी अनुमोदन दीले.तर व्हाइस चेरमन पदासाठी रमेश नरवडे यांच्या नावाची सुचना संचालक भिवाजी नेहुल यांनी मांडली व भानुदास सोनवणे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी पारधे साहेब आणि सचिव भाउराव कासार यांचा नवनिर्वाचित मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. नंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाचा ही सन्मान करण्यात आला. नवीन तेरा संचालकापैकी कचरू नेहुल,रमेश नरवडे,भास्कर नेहुल, भिवाजी नेहुल, संदिप नेहुल, प्रमोद काकडे,भानुदास सोनवणे, आदिनाथ गीरी,सौभाग्यवती सविताताई नेहुल ईत्यादी (९)संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे,व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ, माजी संचालक चारुदत्त वाघ यांनी सन्मान करून अभिनंदन केले आहे. भैरवनाथ शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व जेष्ठ नेते विठ्ठलराव नेहुल साहेब यांनी केले. या पदाधिकारी निवडीच्या वेळी भागवत नेहुल, विक्रम नेहुल सर,अशोक नेहुल, वसंत नेहुल,यांच्या सह अनेक मांन्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here