प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार बहुमान

0

मुंबई : मुरबाड-कल्याण (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कुणबी समाज उन्नती सभागृह, मुरबाड येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांना ह.भ. प. निलेश महाराज कोरडे (राष्ट्रीय किर्तनकार-समाज प्रबोधनकार) यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२० हा किताब पटकावणाऱ्या सिद्धी कामथ यांनी इरादा आणि जग्गा जासूस या हिंदी सिनेमातून आणि वृत्ती, सांगा बाजीराव, गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात या मराठी सिनेमातून आपली अभिनय कारकीर्द सुरू केली. तसेच दिया और बाती , क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेत तर लक्ष ,नांदा सौख्यभरे, क्राइम टाइम, प्रेमा तुझा रंग कसा, हास्यरंग, ये फसा, गजरा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, फुलाला सुगंध मातीचा, क्रिमिनल या मराठी मालिकांत त्यांनी विविधरुपी भूमिका साकारल्या. सिद्धी कामथ यांनी अभिनयाबरोबर समाजसेवेची आवड सुद्धा जोपासली आहे. त्याचे फलित म्हणुन त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तक्रार निवारण प्रमुख पदी, भारतीय महाक्रांती सेनाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणुन आपली धुरा सांभाळत आहेत. त्यांना आतापर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२०, समाज गौरव पुरस्कार २०२०, आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१, समाज भूषण पुरस्कार २०२१ आणि आंतरराष्ट्रीय मानवता अवॉर्ड २०२१ असे अनेकविध पुरस्कार मिळाले. तसेच जागतिक टपाल दिना निमित्त स्वतःचे छायाचित्र असलेला माय स्टॅम्प हे पोस्टल तिकीट सुद्धा त्यांना त्यांच्या कार्याबद्दल प्राप्त झाले आहे.त्यांच्या या सामाजिक आणि उल्लेखनीय कार्याचा उचीत गौरव म्हणुन स्वतंत्र संपादक पत्रकार संघातर्फे त्यांना राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल मुंबई महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here