मुख्यमंत्र्यांची आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा हवेतच विरली

0

(सुनिल नजन/अहमदनगर) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी यांनी महाराष्ट्र विधानसभेत राज्यातील 300 आमदारांना मोफत घरे देणार असल्याची घोषणा केली. यामुळे संपूर्ण देशभर प्रचंड प्रमाणात गदारोळ सुरू झाला. एकिकडे पंजाब विधानसभेत आमदाराचे निव्रुत्ती वेतन बंद करण्याची घोषणा केली. आणि सरकारी पैसे वाचविले. व दुसरीकडे महाराष्ट्रात आमदारांना मोफत घराची घोषणा केली गेली.त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये या घोषणेच्या विरोधात प्रचंड प्रमाणात गदारोळ सुरू झाला. सरकार विषयी सर्व सामांन्य जनतेत तीव्र नाराजी पसरली. हा जनतेचा सरकार विरोधातील असंतोष ग्रुहनिर्माण मंत्री ना.डॉ जितेंद्र आव्हाड यांनी ओळखला.आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या घोषणेच्या लिखाणाची शाई वाळते न वाळते तोच ग्रुहनिर्माण मंत्री ना. डॉ जितेंद्र आव्हाड यांनी घाईघाईने ट्विट करून या घोषणेची हवा काढून टाकली. त्यांनी ट्विटरवर ट्विट केले की मुख्यमंत्र्यांनी गोरेगाव उपनगरात म्हाडा तर्फे आमदारासाठी जी 300 घरे बांधून देण्यात येणार आहेत ती मोफत नसून प्रत्येक आमदाराला या घरासाठी (७०लाख )रुपये मोजावे लागतील. असे जाहीर केले. सदर घराच्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्चासह सर्व अंदाजीत रक्कम सत्तर लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.ही रक्कम संबंधीत आमदार महोदयाकडून वसुल करण्यात येणार आहे.असे ट्विट करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या घोषणेची हवाच काढून टाकली.यामुळे आमदाराच्या मोफत घराची योजना हवेतच विरली असल्याचे दिसून येते. आमदारांच्या मोफत घराच्या घोषणेमुळे सर्व सामांन्य नागरिकामधे सरकार विषयी प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली होती.महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, रोजगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकार ते सोडवत नाही आणि आमदारांना मोफत घराची घोषणा करतय हे लोकांना पटेनासे झाले.संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली, म्हणून जनतेतील असंतोष ओळखून डॉक्टरांनी घाईघाईने निर्णय घेऊन लगेच आमदारांना घरे मोफत नसल्याचे जाहीर करून टाकले.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here