चंद्रमणी बुद्ध विहाराचा नुतनीकरण सोहळा संपन्न.

0

मुंबई-कामाठीपुरा (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
कामाठीपुरा विभागातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ४५ अंतर्गत जिर्ण झालेल्या चंद्रमणी बुद्ध विहाराचे ४० वर्षांनंतर स्थानिक नगरसेवक श्री. जावेद जुनेजा यांच्या नगरसेवक निधीतून बांधलेल्या सदर विहाराचे नुतनीकरण समारंभ आमदार अमिनभाई पटेल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, तर नाम फलकाचे उद्दघाटान नगरसेवक श्री.जावेद जुनेजा यांच्या हस्ते पार पडले.प्रास्ताविक भाषण संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबूराव जाधव यांनी करून ४५ वर्षांच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री हे होते. या प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक कलावंत व पत्रकार महेश्वर तेटांबे, कवि – वृत्त पत्रलेखक शशिकांत सावंत, सुनील भाऊ, तांबे, सुधीर गावडे, मिलिंद शिंदे, श्री. राजेंद्र लकेश्री, आमदार अमिन पटेल, नगरसेवक जावेद जुनेजा, कॉन्ट्रॅक्टर किशोर भाई इत्यादी मान्यवरांचा शॉल, श्रीफळ व गुच्छ देवून संस्थेचे अध्यक्ष श्री बाबूराव जाधव, सरचिटणीस गौतम यादव, शांताराम कोलगे, नरेश कांबळे, श्रीमती विमलताई वाघचौरे, रवींद्र जाधव, सुनील जाधव,अरूण जाधव, इत्यादिनी त्यांच्या यथोचित सन्मान केला.( धन्यवाद,गुरुनाथ तिरपणकर,पत्रकार,९०८२२९३८६७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here