पोषण अभियानातील भरीव योगदानामुळे नाशिक (नागरी)-२ प्रकल्पाचा राज्यस्तरावर सन्मान सुट्टीच्या दिवशीही घेतली मेहनत. देशभरात पोहोचविले जनजागृतीसाठीचे व्हिडिओ हा सन्मान प्रकल्पातील माझ्या सर्व अंगणवाडीताई व मदतनिसताईंचा आहे.

0

मुंबई : पोषण अभियानातील भरीव योगदानामुळे नाशिक (नागरी)-२ प्रकल्पाचा राज्यस्तरावर सन्मान सुट्टीच्या दिवशीही घेतली मेहनत. देशभरात पोहोचविले जनजागृतीसाठीचे व्हिडिओ हा सन्मान प्रकल्पातील माझ्या सर्व अंगणवाडीताई व मदतनिसताईंचा आहे..👉अजय फडोळ प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर अखेर साजरा केला गेला..”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा करण्यात आला…नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले होते..कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता.. पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले होते..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली..सर्वांशी चर्चा करुन नियोजन करण्यात आले..प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश देशभरातील जनतेपर्यंत पोहोचवतील असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता तयार केले..यासाठी या सेविकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त वेळ देवून कामकाज केले..जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले..तर पोषण अभियान हे एक जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट, न्यूज पोर्टल इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन देशभरात हे व्हिडिओ पोहोचविले,आमच्या टिमने हे जन आंदोलन यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे..यात आमच्या प्रकल्पातील अंगणवाडीताई अन्नपूर्णा अडसुळे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव यांचे संपूर्ण कुटुंबच या जन आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले होते..तसेच आम्ही या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीचे” व्हिडिओद्वारे तयार केलेले संदेश सोशल मिडियाचे माध्यमातून देशभरातील जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले..०८ मार्च २०२२ रोजी आमच्या प्रकल्पाचा या कामगिरीमुळे मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री, मा. महिला व बाल विकास मंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवून मुंबई येथे सन्मान करण्यात आला..हा सन्मान प्रकल्पातील प्रत्येक ताईचा आहे..हा सन्मान प्रकल्पातील सर्वांच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ, मुख्यसेविका शितल गायकवाड, अंगणवाडी सेविका सुहासिनी कसोटे, अन्नपूर्णा अडसुळे पुष्पा वडजे, मदतनिस कविता बर्वे यांनी मुंबई येथे स्विकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here