छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषणाने दुमदुमले खारघर

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन चर्चिला जाणारा “एक शहर, एक शिव जयंती सोहळा” उत्तमरित्या जल्लोषात पार पडला. हा शिवजयंती सोहळा सफल करण्यासाठी आपण दिलेले योगदान, आयोजक, सहकारी, आलेले- न आलेले शिव भक्त, शिवमावळे, शिवप्रेमी यांचे मनःपुर्वक आभार आणि अभिनंदन ! मात्र विशेष आभार लेझीम पथक, शिव ज्योत पथक ,पालखी पथक, पाळणा पथक, आरतीसाठी सहभागी झालेल्या महिला, भजनी मंडळ आणि नवी मुंबईमधून आले युवक यांचे खूप खूप अभिनंदन. असेच एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करून आपल्या हातून समाज सेवा घडावी.मित्रांनो मराठा समाज खारघरच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती साजरी केलीच जाते. मात्र तिला भव्य दिव्य स्वरूप देण्या बाबत 10 ते 12 दिवस आधी झालेल्या बैठकीत निर्णय झाला. नाविन्यपूर्ण असं आपण पनवेल करांना नवी मुंबईकरांना आपण द्यावं यावर अनेकांकडून सूचना सुद्धा आल्या अन यावर शिक्कामोर्तब झाले . एक शहर एक शिवजयंती या बॅनर खाली आपण सारे जिद्दीने आणि चिकाटीने तयारीला लागलो आणि कमी वेळेत आपण ते करून दाखवलं.कार्यक्रमात कुठलंही गालबोठ न लागता उत्कृष्ट असं सादरीकरण खारघरवासीयांना, पनवेलकरांना, नवी मुंबईकरांनी अनुभवले. आणि त्यामध्ये आम्हाला प्रायोजक म्हणून शिवभक्त शिवप्रेमींची सेवा करण्याची संधी मिळाली. आपण आम्हाला संधी दिली तर यापुढेही उत्तमरित्या अधिक चांगल्या पद्धतीने दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत सेवा देण्याचा, आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सिडको तयार केलेल्या विविध नोड मधील नागरिकांचे जीवन सुसह्य आनंदमय कसे होईल यासाठी सदैव कार्यतत्पर राहू.( आपले -लीना,अर्जुन गरड, मधू पाटील,अनिता भोसले
बालेश भोजने,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here