यादवबाबाची वाघोली येथे महंत राम महाराज झिंजुर्के यांच्या किर्तनाने हरिणाम सोहळ्याची सांगता

0

(अहमदनगर प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील यादवबाबाची वाघोली येथे वै.सदगुरू यादवबाबा वाघोली कर यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने२०ते २८फेब्रुवारी या काळात अखंड हरिणाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प. भालसिंग महाराज वाघोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. सर्व ह.भ.प.कादे महाराज,उंबरेकर महाराज, गाढे महाराज, भालसिंग महाराज, कोंगे महाराज, भोसले महाराज, कराळे महाराज, शिरसाठ महाराज यांची किर्तने झाली. यामध्ये काकडा भजन,ज्ञानेश्वरी वाचन,हरीपाठ,हरीजागर,दिंडी प्रदक्षिणा, प्रीतीभोजन,ईत्यादी कार्यक्रम पार पडले.शेवटी महंत ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here