वाघोली येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन

0

(अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या वाघोली येथिल संत सदगुरु यादवबाबा वाघोली कर यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतीथी निमित्ताने ह.भ.प.भालसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२०ते२८फेब्रुवारी याकाळात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.हरिपाठ,भजन,किर्तन, काकड आरती,ज्ञानेश्वरी वाचन ई.कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सर्व ह.भ.प.अंकुश महाराज कादे,भागवत महाराज उंबरेकर,एकनाथ महाराज गाढे,भालसिंग महाराज वाघोलीकर,अशोक महाराज कोंगे,मच्छिंद्र महाराज भोसले, ज्ञानेश्वर महाराज कराळे,भानुदास महाराज शिरसाठ,यांची किर्तने होणार आहेत. दि.२७फेब्रुवारी रोजी दिंडी प्रदक्षिणा होउन,दि.२८फेब्रुवारी२०२२ रोजी सकाळी१०ते१२ ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने या हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघोली ग्रामस्थ व सद्गुरु यादवबाबा वारकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here