गोरगरिबांना आणि फूटपाथ वासियाना अन्नधान्य आणि पाणी वाटून वाढदिवस केला साजरा.

0

मुंबई : लालबाग-परेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
नुकताच सिने दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांच्या
आरवी (परी ) महेश्वर तेटांबे हिचा सहावा वाढदिवस साजरा झाला. गेले दोन ते तीन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यामुळे गोरगरीब आणि सामान्य जनतेचे बरेचसे आर्थिक नुकसान झाले. त्यात काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तेव्हा त्यावेळी सिने नाट्य दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस गरजूना मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता. आणि आता याही वर्षी देखील महेश्वर तेटांबे यांनी दिनांक १७ फेब्रुवारी ला आपल्या मुलीचा आरवी (परी ) महेश्वर तेटांबे हिचा सहावा वाढदिवस थाटात साजरा न करता परळ गांव, टाटा हॉस्पिटल तसेच शिवडी आणि श्रावण यशवंते चौक विभागातील ७५ ते ८५ फूटपाथ वासियांना आणि गोरगरिबांना अन्नधान्य, पाणी बॉटल वाटून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.( धन्यवाद,महेश्वर तेटांबे (सिने नाट्य दिग्दर्शक ,पत्रकार ) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here