डॉ. शिरोडकर हायस्कूल १९८८ दुपार अधिवेशन आयोजित ” देणे मानवतेचे ” हा माहितीपट तसेच शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्या अतूट नात्याचा स्नेहबंध सोहळा संपन्न.

0

परेल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
जुलै २०२१ मध्ये कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण आणि कोल्हापूर शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने परेल येथील डॉ. शिरोडकर शाळेच्या १९८८ च्या दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यानी उद्भवलेल्या पूरमय परिस्थितीतील पूरग्रस्त जनतेला मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच थोडेबहुत आर्थिक सहकार्य करून आपले कर्तव्य पालन केले आहे आणि पुरमय परिस्थितीचा आढावा घेवून त्यादरम्यान बनवलेले व्हिडिओ संकलित करून एक प्रेरणादायी आठवण साठवावी या उद्देशाने शिरोडकरच्या माजी विद्यार्थ्यांनी परेल येथील प्रख्यात शिरोडकर हायस्कूल, शिशु विकास येथे नुकताच आपला स्नेहबंध सोहळा आणि देणे मानवतेचे हा माहितीपट सादर करून समाजाशी असलेले आपले नाते अधिकच दृढ केले आहे. सुरवातीला शिरोडकर शाळेच्या दिवंगत शिक्षकांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष धर्माजी सोनू गावकर आणि अन्य उपस्थित मान्यवरांसह कै.डॉ.रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालक नेत्रा पाष्टे आणि स्वाती नाईक यांनी स्वागतपर गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्माजी सोनू गावकर यांच्या अध्यक्षतेखाली देणे मानवतेचे हा सामाजिक माहितीपट सादर करण्यात. याप्रसंगी उपस्थित मान्यवर ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, लोकप्रिय फणी आणि गाणी चे सादरकर्ते जगदविख्यात कलावंत शशिकांत खानविलकर, अभिनेते सुरेश डाळे, शिरोडकर शाळेचे माजी शिक्षक देशपांडे सर, शिंदे सर, भोसले सर, पराग विठ्ठल चव्हाण, सोनावणे सर, भोसले मॅडम, अभिनेता-दिग्दर्शक राम माळी, दिग्दर्शक गणेश तळेकर, अभिनेत्री लक्ष्मी पन्धे, राजू देसाई (रायगड दर्शन घडविणारे-गिर्यारोहक) तसेच शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, देवीदास लुडबे, अजित साकरे, मकरंद तळेकर, श्याम करंगूटकर, संजय तुरंबेकर, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, संतोष नाटाळकर, गणेश कार्ले, रणजित घोसाळकर, दिगंबर महाडेश्वर, मनाली, पार्टे सर, मनिष टिपरे, तृप्ती डीसोझा, स्वाती दळी, प्रेरणा पार्टे, स्वाती नाईक, संतोष यादव, सीमा बांदेकर, नेत्रा पाष्टे, निलेश परळकर, विनोद तावडे आदी सर्व माजी विद्यार्थ्यानी आपापल्या परीने सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी महेश्वर तेटांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून स्नेहबंध सोहळ्याची सांगता करण्यात आली.( धन्यवाद,डॉ. शिरोडकर हायस्कूल,परेल
१९८८ दुपार अधिवेशन व्हटसप समुह,महेश्वर तेटांबे
९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here