
(अहमदनगर प्रतिनिधी)नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र घोटण येथे ह.भ.प.रामहरी महाराज निकम व नितीन महाराज परभणे यांनी पंचाऐंशी दिवसात नर्मदा नदिला पायी प्रदक्षिणा घालून गावी आल्यानंतर धर्मनाथबीज किर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. वै.आश्रु गंगाराम निकम यांच्या प्रेरणेने, ह.भ.प.महादेव महाराज घुगे यांच्या आशिर्वादाने, ह.भ.प.रामहरी महाराज निकम यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने किर्तन महोत्सव सोहळ्याचे दि.२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात आयोजन करण्यात आले होते.नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. ह.भ.प.ओंकार पाटील, सागर पठारे,ओमकार राजपूत, नितीन परभणे यांची प्रवचणे,तर ह.भ.प.अँड सिद्धनाथ राउत,सोमनाथ पाटील, लिलाधर पाटील, प्रा.निलेश कोरडे,यांची किर्तने झाली.ह.भ.प. अशोक इलग महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या धर्मनाथबीज किर्तन महोत्सवाची सांगता झाली.प्रथम ह.भ.प.एकनाथ शिंदे व शिवाजी क्षिरसागर यांच्याहस्ते विना पुजनाने सुरुवात झाली.ह.भ.प. महादेव मोटकर,भारत टाकळकर, संजय दौंड,कल्याण मोटकर,माणिक धतुरे यांनी व्यासपीठ चालवले.ह.भ.प. अनिकेत बांगर,रामेश्वर मिसाळ,आदित्य दिवेकर, राहुल वाघ,समाधान घाडगे,माधव होंडे,कल्याण सावळे,प्रशांत लादे,आकाश सायंबर,रविकांत चव्हाण, या आळंदी येथील गायकांनी गायन केले.केशव मोरे यांनी आवाज लहरी निर्माण केल्या. ज्ञानेश्वर शिंदे यांनी मंडप व्यवस्था चोख ठेवली होती. गोपाळ मोरे यांनी दिंडी प्रदक्षिणेत सहकार्य केले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.शेवटी ३६१८ किलो मीटरचा प्रवास कसा झाला याचे सविस्तर वर्णन निकम व परभणे महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)
