तिसगावला महाविद्याल सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत ःना.प्राजक्तदादा तनपूरे

0

(अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तिसगाव येथे महाविद्यालय सुरु करण्यासाठी विषेश प्रयत्न चालू आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उर्जा, आदिवासी, नगरविकास, उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिली.ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील शेतीसाठी नवीन वीज उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. शिरापूर, निवडुंगे, मढी,करडवाडी या गावांना शेतीसाठी पुर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी १८ लाख १५ हजार रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर लांबीच्या नवीन मढी फिडरचा शुभारंभ ना.तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे हे होते. ना.तनपुरे यांनी पूरग्रस्त भागातील बंधारे दुरुस्ती करणार, मढीप्रमाणे कासारपिंपळगाव साठीही नवीन फिडर बसवन्या संदर्भात वीज अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे. महाविद्यालय हे पुणे मुंबईतील एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या धर्तीवर सुरू करण्यासाठी शासकीय आराखड्यात प्रयत्न करू असे सांगून तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाथर्डी तालुक्यातील पाचही गटात महाविकास आघाडीच्या विचाराचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून तयारीला लागा असे सांगत एकप्रकारे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडनुकीचे अप्रत्यक्षरित्या रणशिंगच फुंकले असल्याचे दिसून आले.या सोहळ्यासाठी वीज कार्यकारी अभियंता काकडे साहेब, सहाय्यक अभियंता अहिरे साहेब, ठाकूर साहेब, शिंगटे साहेब, पटारे साहेब, गीते साहेब, काटकर साहेब, वेताळ साहेब, इंगळे साहेब, उगार साहेब, राजळे साहेब, गोसावी, मरकड,निंबाळकर, बडवे,शेख साहेब ईत्यादी विज कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के, शिवशंकर राजळे,भगवान मरकड, राजू शेख, आसाराम ससे,जालिंदर वामन,नितिन लवांडे, संभाजी पालवे, संजय लवांडे, राहुल गवळी, राजेंद्र पाठक,रफिक शेख ईलियास शेख,सुनिल लवांडे,नितीन लोमटे,महेश लोखंडे, कल्याण लवांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here