पंचवटी बरोबरच , गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याबाबत निवेदन

0

मुंबई :  पंचवटी बरोबरच , गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेने वेळोवेळी विनंती अर्ज , निवेदने , मागणीचे पत्र रेल्वे प्रशासन तसेच जन प्रतिनिधी ( एम.पी. , एम.एल.ए. ) यांना लेखी व प्रत्यक्ष भेटुन दिलेले आहे . मागणी केल्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस सुरु करुन तीला एम एस टी वापराची परवानगी देखील देण्यात आली आहे . परंतु पंचवटी ही ज्या वेळेत सुरु आहे त्या वेळेत तिचा उपयोग सर्व सामान्य जनतेला हवा तसा होत नाही त्यामुळे त्याच धरतीवर गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्यात येऊन मासिक पास धारकांना परवानगी देण्यात यावी जेणे करून विद्यार्थी आणि चाकरमानी यांनी सोयीचे होईल . तसेच गोदावरीला एक स्वतंत्र टि.सी. व आर.पी.एफ. तसेच मनमाड स्टेशनसाठी मासिक पास खिडकी सुरु करण्याबाबत देखील अनेकदा मागणी केली आहे . आजतायगत संबंधीत रेल्व प्रशासन , लोकप्रतिनिधी यांच्याकडुन कुठल्याही प्रकारचा होकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशी व ये – जा करणारे चाकरमान्यांना तिव्र आंदोलन छेडल्याशिवाय अन्य दुसरा पर्याय राहणार नाही . नांदगाव , मालेगांव , येवला आणि कोपरगांव तालुक्यातून कमीत कमी ६००० प्रवासी अप डाऊन करतात त्यामुळे सगळ्या तालुक्यात अडचण निर्माण झाली आहे . त्यामुळे सगळे लोक रस्त्यावर उतरतील आणि त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील ह्याची नोंद घ्यावी . नवीन वेळापत्रक लागु होत आहे त्यानुसार अद्यापही गोदावरी एक्स्प्रेस अजून ही चालु झालेली नाही , तरी रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्स्पेस लवकरात लवकर सुरू करून सर्व सामान्य प्रवाशी , व्यापारी , विद्यार्थी , चाकरमानी यांची जीवनवाहिनी म्हणून समजली जाणारी गोदावरी एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरु करण्यात यावी . ऑफिस कामाच्या वेळेत तसेच इतरही सर्व कामाच्या वेळेत धावणारी गाडी असुन ती बंद असल्याने खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे . तरी आपण या निवेदनाचा गांभिर्यपूर्वक विचार करुन चाकरमान्यासाठी सुरु असलेली परंतु २२ मार्च २०२० पासून बंद असलेली गोदावरी , इगतपूरी मनमाड शटल या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात असे निवेदन देण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here