रनादेवपाडे येथे प्रथमच रेशन वाटपासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची परवानगी

0

नाशिक : रनादेवपाडे येथे प्रथमच रेशन वाटपासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची परवानगी
वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे मो.9130040024,उपसरपंच शिवाजी आहिरे यांच्या प्रयत्नांना यश,महालपाटणे दि.२७ रणादेवपाडे हे देवळा तालुक्यातील जेमतेम हजार लोकवस्तीचे लहानसे खेडे असून देवपूरपाडे ग्रुपग्रामपंचायतमध्ये असल्याने व महसुली गाव देवपूरपाडे असल्याने येथील ग्रामस्थांना आपल्या हक्काचे स्वस्त धान्य घेण्यासाठी येथून तीन – चार किलोमीटर पायपीट करत देवपूरपाडे गावी जावे लागत होते त्यामुळे गावातच रेशन मिळावे अशी नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. परंतु लोकसंख्या व कुटुंबसंख्येची मर्यादा असल्याने दुसरे रेशन दुकान येथे सुरू करता येत नव्हते, परंतु नागरिकांची समस्या लक्षात घेऊन येथील उपसरपंच शिवाजी आहिरे यांनी आमदार राहुल आहेर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने याठिकाणी रेशन वाटपासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची परवानगी मिळवून दिली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या गावातच रेशन मिळाले म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.याठिकाणी बहुसंख्य आदिवासी व कष्टकरी आणि मजुरी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याने त्यांना दर महिन्याला डोक्यावरच पायपीट करत आपले रेशन आणावे लागत होते व त्यासाठी त्यांना आपली एका दिवसाची मजुरी बुडवावी लागत होती त्यामुळे त्यांनी याकामी परिश्रम घेणारे उपसरपंच शिवाजी (आप्पा)आहिरे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, भा.ज.पा. युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील सावंत यांना धन्यवाद दिले आणि आमदार महोदयांनीव मा.केदा( नाना) आहेर यांनी याकामी विशेष लक्ष देऊन गावाची समस्या सोडवून गरिबांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल आभार मानले.याप्रसंगी सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच शिवाजी आहिरे, सदस्य बाळू सावंत, जिभाऊ सोनवणे, मन्साराम जोंधळे, सुनील सावंत, दिलीप जोंधळे, रवी शेवाळे, रेशन दुकानदार वसंत शिरसाठ,अशोक शिरसाठ, राकेश शेवाळे,आदी उपस्थित होते.”रणादेवपाडे ते देवपूरपाडे या गावांमधील अंतर साधारणतः तीन ते चार किमी असून येथील ग्रामस्थांना रेशन घेण्यासाठी देकपूरपाडे येथे यावे लागायचे, बऱ्याच दिवसांपासून येथील ग्रामस्थांची त्यांच्या गावातच रेशन मिळावे अशी मागणी होती, मा.आमदार राहुल आहेर व केदा आहेर यांच्या सहकार्याने आम्ही पाठपुरावा करून आज प्रथमच रणादेवपाडे गावात रेशन वाटप केंद्र सुरू झाले याचा आनंद आहे, यापुढेही गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत”- शिवाजी आहिरे (उपसरपंच देवपूरपाडे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here