भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा तळवलकर यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार.

0

मुंबई-दादर-प्रतिनिधी: जागतिक टपाल दिन ( ‘वल्ड पोस्ट डे’ ) हा जगभरातून साजरा केला जात आहे. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा लाभ घेतात. ही सेवा फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो.महत्वाचं आणि स्वस्त साधन म्हणजे पोस्ट सेवा.
भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) दिनांक ११ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार असून याच जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधूंन भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा तळवलकर यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.. पौर्णिमा तळवलकर यांनी आपल्या करियरची सुरवात सुरवातीच्या काळातील लोकप्रिय मराठी मालिका दामिनी, स्वामींनी, बंदिनी, घरकुल, मी एक बंडू, गाणे तुमचे आमचे, अवंतिका, कळत नकळत, कालाय तस्मै नमः , होणार सून मी ह्या घरची, लेक माझी लाडकी, फुलपाखरू, आणि आताच्या नकटीच्या लग्नाला यायचे, रंग माझा वेगळा, मन उडू उडू झालं विशेष करून त्यांच्या या सर्वच मालिका विशेष गाजल्या आणि पौर्णिमा एक प्रतिभाशाली अभिनेत्री म्हणून गणली गेली. मालिकांतून अभिनय करता करता रंगभूमीशी आपले नाते घट्ट करत ओळख ना पाळख, वाह गुरु, मदर्स डे, कुछ मिठा हो जाये, वाजे पाऊल आपले इत्यादी मराठी नाटकात तर घर एक मंदिर, अग्नी, दिल ढुंढता है, क्यूँ रिश्तौ मी कट्टी बट्टी इत्यादी हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.त्याचबरोबर त्यांची हिंदी फिल्म प्यार तो होना ही था यात देखील अभिनय केलेला आहे. दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या..हसऱ्या आणि बोलक्या तसेच वक्तशीरपणा जपणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचा त्यांच्या कला आणि सामाजिक कार्याचा उचीत गौरव म्हणुन भारतीय टपाल विभाग दादर मुख्य डाक कार्यालय, मुंबई तर्फे त्यांचा त्यांच्याच छायाचित्राचे टपाल तिकीट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल मुंबई महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here