राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ अंतर्गत नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕनलाईन वेबिनारचे यशस्वी आयोजन”मानवी आरोग्या करिता योग आयुष आणि पोषण” या विषयांवर तज्ञांनी केले मार्गदर्शन मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी घेतली मेहनत – अजय फडोळ बाल विकास प्रकल्प अधिकारी एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक 👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ अखेर साजरा केला जात आहे..”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा केला जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे..कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता.. पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले आहे..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली..सर्वांशी चर्चा करुन नियोजन करण्यात आले.. प्रकल्पांतर्गत सर्व लाभार्थी तसेच अंगणवाडीताई व मदतनिसताई यांचेसह प्रकल्पातील सर्व कर्मचारी वर्गाची सुरक्षितता विचारात घेऊन आॕनलाईन उपक्रमांवर भर देण्यात आला..प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश देशभरातील जनते पर्यंत पोहोचवतील असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता स्वतः तयार केलेत..यासाठी या सेविकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त वेळ देवून कामकाज केले..जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले..तर पोषण अभियान हे एक जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन देशभरात हे व्हिडिओ पोहोचविले.. बुधवार दिनांक २९/०९/२०२१ रोजी प्रकल्पात लाभार्थी,पालक,नागरिक, अंगणवाडी सेविका,मदतनिस यांचेसाठी आॕनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते..यात “मानवी आरोग्याकरिता योग आयुष आणि पोषण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले..यात मानवी जीवनात आहाराचे महत्व या विषयावर डाॕ. स्नेहल दंताळे आहार तज्ञ यांनी तर दैनंदिन जीवनात योगाचे महत्व या विषयावर गीता गायकवाड योग आणि हिलिंग मार्गदर्शक यांनी सर्वांना मार्गदर्शन केले..या वेबिनारमध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त बाल विकास प्रकल्प अधिकारी करवीर जि. कोल्हापूर मा.ज्योती पाटील यांनी आॕनलाईन सहभाग नोंदविला.हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले..आम्ही या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी” व त्या आधारे कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. अशी माहिती प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here