शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांना दिलेल्या धमकीचा मनमाड शहर शिवसेनेने जाहीर निषेध नोंदवला

0

मनमाड : नांदगाव विधानसभा लोकप्रिय शिवसेना आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांनी आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच आपात्कालीन परिस्थिती मधील जनतेच्या मदतीसाठी निधीवातपाबाबत घेतलेल्या जनहितेच्या भूमिकेतून झालेल्या अन्यायाबाबत याचिका दाखल केली आहे. ती माघार घेण्यात यावी म्हणून आपल्या आमदार साहेबांना गुन्हेगारी जगतातून धमकीचा फोन आले. अशा निच प्रवृत्तीच्या विरोधात योग्य ती कारवाही झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना मनमाड शहराच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केली तसेच षंढ प्रवृत्तीचा मनमाड शहर शिवसेना जळजळीत निषेध करते असेही ते बोलले.तसेच मनमाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांना निवेदन देऊन वरिष्ठ पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली निवेदन देतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समनव्यक सुनील पाटील, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना गटनेते गणेश धात्रक, महिलाआघाडी उपजिल्हासंघटक संगीताताई बागुल, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्ना दरगुडे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, नगरसेवक लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, विजू मिश्रा, जितू शिंदे, सुनील हांडगे, कैलास भाबड, उपशहरप्रमुख प्रवीण धाकराव, वाल्मिक आंधळे, युवासेना शहरअधिकारी अंकूश गवळी, योगेश इमले, कयाम सय्यद, संघटक महेंद्र गरुड, ता युवासेना सरचिटणीस सचिन दरगुडे, वाहतूकसेना शहरप्रमुख अमजद शेख, शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष तालुकाप्रमुख विकास वाघ, धीरज हिरे, अजिंक्य साळी, सनी आहेर, सिध्दार्थ छाजेड, आप्पा कांदे, मयूर थोरात, मिहिर महसिया आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here