महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या पारंपारिक लोककला व सोशल मिडियाचा वापरकरुन कोरोनाचे पार्श्वभूमीवरही राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मधील डॕशबोर्ड नोंदणीचे उद्दिष्ट केले १९ व्या दिवशीच साध्य, देशभरात पोहोचविले जनजागृतीसाठीचे व्हिडिओ अंगणवाडीताईंचे कुटुंबाचाही जन आंदोलनात सक्रिय सहभाग.सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियानात ठेवले आहे सातत्य- शितल गायकवाड मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक : राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर अखेर साजरा केला जात आहे.”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा केला जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे.कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता.. पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले आहे..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली.सर्वांशी चर्चा करुन नियोजन करण्यात आले.प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश देशभरातील जनतेपर्यंत पोहोचतील असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता तयार केलेत.जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले..तर पोषण अभियान हे जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन देशभरात हे व्हिडिओ पोहोचविले,आमच्या टिमने हे जन आंदोलन यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.यात आमच्या प्रकल्पातील अंगणवाडीताई अन्नपूर्णा अडसुळे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव यांचे संपूर्ण कुटुंबच या जन आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले आहे.तसेच आम्ही या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीचे” व्हिडिओद्वारे तयार केलेले संदेश सोशल मिडियाचे माध्यमातून देशभरातील जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here