नाशिक विभागातील अधिकारी एकजूटीने कामकाज करुन पोषण माह सप्टेंबर २०२१ यशस्वी करणार,

0

नाशिक : 👉महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अॕडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आज नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या..यावेळी नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव येथील अधिकारी उपस्थित होते..नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी विभागात २०१८ पासून सातत्याने पोषण अभियानामध्ये चांगले कामकाज करण्यात आले आहे..या चांगल्या कामकाजामुळे याआधी नाशिक जिल्हाला राज्यस्तरावर तर नाशिक शहरातील दोनही प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर पोषण अभियानात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत..त्याबद्दल मा. मंत्री महोदयांनी सर्वांचे अभिनंदन केले..या कामात अंगणवाडीताई व मदतनिसताई यांचा सिंहाचा वाटा असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले..असेच कामकाज राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२१.मध्ये सर्व नाशिक विभागात ऐकजूटीने करुन..सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध राहू असेही उपस्थित सर्वांनी सांगितले..यावेळी विभागीय उपायुक्त नाशिक विभाग चंद्रशेखर पगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक-२ अजय फडोळ, सिन्नर ग्रामीणचे गोरख शेवाळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, सुधीर पाटील, विजय परदेशी, संजय मोरे यांचेसह विभागातील मुख्यसेविका, अंगणवाडीसेविका व मदतनिस उपस्थित होत्या..यावेळी पोषण माह बाबत जनजागृती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here