कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा… डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य

0

मुंबई-परेल-प्रतिनिधी: सध्याच्या कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली. इतकंच नव्हे तर कोल्हापूर मधील करंजफेन आणि सावर्डे या गावांत देखील घरं च्या घरं उध्वस्त झाली. तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने परेल येथील डॉ. शिरोडकर शाळेच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या व्हटसप समुहतर्फे कोल्हापूर मधिल करंजफेन आणि सावर्डे या तीन गावांतील पुरमय परिस्थितील जवळजवळ ६० कुटुंबीयांना नैतिक कर्तव्य म्हणुन ब्लँकेट, वनस्पती तूप, चटई, नवीन कपडे, सनिटरी नपकीन, शैक्षणिक साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य पालन केले आहे. याप्रसंगी महेश्वर तेटांबे,, श्रीकांत आयरे, योगेश मोर्डेकर, चंद्रकांत आयरे, नेत्रा पाष्टे, संतोष जैतापकर, संजय गवाणकर, देवीदास लुडबे, गीतांजली, शुभांगी आर्डेकर, राजेश विनायक कदम, अजित साकरे, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, संतोष नाटाळकर, श्याम करंगुटकर, रणजित घोसाळकर, विनायक हळदणकर, सुर्यकंत आयरे, सुशील डिचोलकर, मनिषा सुपेकर, अण्णा गावकर, स्मिता राणे, गणेश कारले, नीता कदम, सोनल सावंत, मिलिंद चाळके, डॉ. समीर सकपाळ, समीर डगरे, प्रफुल्ल खोंड, विकास अग्रवाडकर, नीलिमा चोपडेकर, योगेश शिरकर, दत्तात्रय थोरात, स्वाती नाईक, विश्वनाथ जोगल, बबन शिरोडकर, राजेश मुणगेकर, विवेक कुबल, सीमा बांदेकर, राहुल पारकर, मिनल फाटक, नितीन कासारे, अनिल पुरळकर आदी सर्व माजी विद्यार्थ्यानी तसेच अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या अमोल वंजारे आदी सर्वांनी आपापल्या परीने योगदान देऊन आपले दातृत्व सिद्ध करून आपले कर्तव्य बजावले आहे.( धन्यवाद,डॉ. शिरोडकर हायस्कूल,परेल,१९८८ दुपार अधिवेशन व्हटसप समुह,महेश्वर तेटांबे,९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here