राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांचा दक्षता हीच सुरक्षा या टीम तर्फे सत्कार… आणि त्यांच्याच शुभहस्ते दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या भागाचे उद्घाटन..

0

मुंबई-माहीम : रसिका थिएटर्स अंतर्गत, रसिका सिने व्हिजन प्रस्तुत.. प्रियांका दत्तात्रय निर्मित आणि आबा पेडणेकर लिखित-दिग्दर्शित दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या ६व्या भागाचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांच्या शुभहस्ते त्यांच्याच माहीम, मच्छीमार नगर येथील निवासस्थानी पार पडले. संतोष पवार यांना १५ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आणि प्रजासत्ताक दिना दिवशी (२६ जानेवारी) रोजी पदक देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. याचे औचित्य साधून दक्षता हीच सुरक्षा ह्या वेबसिरीज मधील सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी मिळून संतोष पवार यांचा त्यांच्याच निवासस्थानी यथोचित सन्मान केला. सत्काराला उत्तर देतांना संतोष पवार यांनी दक्षता च्या सर्व टीम चे कौतुक करून या वेबसिरिज च्या माध्यमातुन वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून तुम्ही समाजप्रबोधनाचे कार्य करत असून तुमच्या या कार्याला नक्कीच यश मिळेल असे उद्गार काढले. याप्रसंगी रसिका थिएटर्स संस्थेचे संस्थापक तसेच मालिकेचे लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर, निर्माती प्रियांका दत्तात्रय, सहदिग्दर्शक गणेश तळेकर, कलाकार अर्चना तांदळे, सुरेश डाळे, राजन काजरोळकर, राहूल मौजे, दिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे, छायाचित्रकार-संकलक शिवाजी सगरे, ऋषिकेश पेडणेकर, संतोष पवार यांच्या अर्धांगिनी श्रद्धा संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.(धन्यवाद’महेश्वर तेटांबे,दिग्दर्शक-पत्रकार,९०८२२९३८६७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here