अण्णाभाऊना भारतरत्न पुरस्कार द्या, साबळे प्रतिष्ठान च्या वतीने पंतप्रधानांना राख्या पाठवून केली मागणी.

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे)  विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीचे व राखी पौर्णिमेचे औचित्य साधून विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मातंग समाजाला अ, ब, क, ड प्रमाणे आरक्षण देण्यात यावे, मातंग समाजाचे विविध विधायक प्रश्न निकाली काढण्यासाठी दलितमित्र मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने राखी पौर्णिमेच्या निमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 जयंती महोत्सव च्या पार्श्वभूमीवर 101 राखी सह विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद मोदी यांना विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रतिष्ठानच्या संचालिका अंजली साबळे, माहेश्वरी साबळे, सुचिता सोळसे, स्नेहल साबळे, हर्षा थोरात, संगीता आव्हाड, ताई मिसाळ, ताराबाई आव्हाड, प्रीती साबळे, प्रमिला कांबळे, श्रुती साबळे, परिगाबाई शिरसाट, कमल आव्हाड,, संगीता पवार, मीना कांबळे, शितल आव्हाड ,आदी महिलांनी101 राख्या सह निवेदन पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here