खंडेलवाल दिगंबर जैन समाज आयोजित भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त विशेष प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमास आमदार सुहास कांदे आणि सौ.अंजुम कांदे यांची उपस्थिती

0

नांदगाव – राष्ट्रसंत आर्यिकागनिनी गुरुमाँ श्री 105 सूप्रकाशमतिजी माताजी यांचे सुमधुर प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आमदार कुटुंबाने लाभ घेतला. आमदार सुहास आण्णा कांदे आणि सौ.अंजुम कांदे यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले ,अनेक तरुण मुला मुलींनी देशभक्ती पर नृत्य सादर केले,थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील बाल गोपाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.हरियाली अमावास निमित्त महिलांसाठी सोलह शृंगार प्रतियोगितेत भाग घेतलेल्या विजेत्या व सहभाग घेतलेल्या महिलांना आमदार कुटुंबा तर्फे सन्मानित करण्यात आले,सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते भगवान महविरांची प्रतिमा, मोमेंटो आणि भेटवस्तू देण्यात आली. आपल्या देशाला संत महात्म्यांची उज्वल परंपरा लाभली आहे म्हणून च कोरोना महमारीत ही आपण प्रगत देशांपेक्षा मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहिलो असे या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे भावना व्यक्त केली, नांदगावकरांच्या उत्तम आरोग्याचा आणि व्यावसायिक प्रगतीचा आशीर्वाद आपण द्यावा ही विनंती केली, शेवटी बोलतांना अहिंसा चौक लवकरच बांधण्यात येण्याचा शब्द आमदार सुहास कांदे यांनी दिला. अनेक धर्म गुण्याोविंदानं राहणारा एकमेव देश म्हणजे भारत देश आपल्या प्रत्येकाला आपल्या देशावर सार्थ अभिमान असावा असे आपल्या स्वतंत्र दीन विशेष प्रवचनात माताजींनी आपल्या प्रबोधनात सांगितले.या ममंगल प्रसंगी अनेक मान्यवर ही उपस्थित होते, जेष्ठ नागरिक मेजर साळुंखे सर,नगराध्यक्ष राजेशजी कवडे,नगरसेवक आनंद कासलीवाल,शिवसेना ता.प्रमुख किरण देवरे,प्रमोद भाऊ भाबड,अध्यक्ष सुशिलजी कासलीवाल, महामंत्री दिलीपजी सेठी, नूतनजी कासलीवाल, पीयूष जी काला, भरत जी कासलीवाल,जयकुमार कासलीवाल वकील साहेब, निलेश जैन,आनंद काला,संतोष जी शर्मा,सूत्रसंचालन अंजुताई सुमेर कासलीवाल यांनी केले कार्यक्रमास खंडेलवाल दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here