दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिका वाटप करून केला स्वतंत्र दिन साजरा

0

मनमाड – प्रहार अपंग क्रांती आंदोलन नांदगाव तालुक्याच्या वतीने अपंगाचे दैवत राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्याज्ञ मार्गदर्शनाखाली दिनांक २२ जुलै रोजी नांदगाव तहसिल कार्यालय येथे दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी आंदोलन केले होते..या आंदोलनाची दखल घेत तहसिलदार उदय कुलकर्णी साहेब यांनी १५ आॅगस्ट स्वंतंत्र दिनाचे औचित्य साधून नांदगाव तहसिल कार्यालया मार्फत जिल्ह्यात प्रथमच आगळा वेगळा उपक्रम राबवून सारनाथ बौध्द विहार नांदगाव या पवित्र ठिकाणी अंत्योदय शिधापत्रिका वाटप करून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला…
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार उदय कुलकर्णी साहेब, नगराध्यक्ष राजेश कवडे, रिपाइचे दिनकर भाई धिवर, प्रहारच्या राज्यसन्मेवक संध्या ताई जाधव, माजी आमदार अनिल दादा आहेर, रिपाइचे देविदास मोरे,प्रहारचे चंद्रभान गांगुर्डे, हिरामण मनोहर ,संदिप सुर्यवंशीआदी मान्यवर उपस्थित होते…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष अनिस शेख,दिपक साळसे, राजाभाऊ गुडगळ सुरेश गांगुर्डे, संगिता सांगळेआदींनी प्रयत्न केले.तालुक्यातुन असंखे लाभार्थी व प्रहार सैनिक उपस्थित होते.सूत्रसंचालन हिरामण मनोहर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आनिस शेख यांनी मानले.( हिरामण मनोहर,जिल्हा संपर्कप्रमुख,9270037813)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here