केशरी व ऑनलाईन नसलेल्या शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित,

0

नाशिक-: येवला शहरातील व तालुक्यातील केसरी शिधापत्रिकाधारकांना गेल्या अनेक दिवसापासून धान्य मिळत नसल्यामुळे रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे संबंधित रेशन दुकानदारांना धान्य मिळत नाही म्हणून विचारणा केली असता तुमचे शिधापत्रिका ऑनलाईन नाही किंवा तुमच्या शिधापत्रिकेतील व्यक्तींचे नावे ऑनलाईन दिसत नाही म्हणून तुम्हाला रेशन मिळणार नाही केव्हा देता येत नाही अशी उत्तरे रेशन दुकानदारांकडून दिली जाते म्हणून केशरी शिधापत्रिका धारक यांना धान्य देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली,एकीकडे कोरोना चा प्रादुर्भाव यामुळे शेतमजूर वर्गाला काम नसल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याने जगायचे कसे हा प्रश्न असताना तालुक्यात हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गाला धान्य मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडून धान्य वाटपाची मदत घेण्याची वेळ आली ,येवला तालुका हा राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री यांचा मतदारसंघ असतानादेखील आर्थिक दुर्बल घटकातील मजुरांना रेशन धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने केसरी शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याची मागणी करण्यात येऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संजय पगारे, वसंत घोडेराव, दयानंद जाधव, शशिकांत जगताप ,राजेंद्र घोडेराव, शिरीष पानपाटील ,नाना पगारे ,वसंत सोनवणे ,हरिभाऊ आहिरे ,प्रभाकर गरुड ,संदीप जोंधळे, भाऊसाहेब आहिरे यासहमहिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगीता साबळे, शबनम शेख जिल्हा संघटक, रेखा साबळे जिल्हा,उपाध्यक्ष महिला आघाडी, वालहुबाई जगताप आदी पदधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here