अदानी एअरपोर्ट’ नावाचा मुंबई विमानतळावरील बोर्ड शिवसैनिकांनी फोडला

0

प्रतिनिधी: अवधुत सावंत: मुंबई विमानतळावरील ‘अदानी एअरपोर्ट’ नावाचा बोर्ड फोडला.. महाराजांचे नाव न लावल्याने संतप्त शिवसैनिकांचा हल्लाबोल ,मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. ‘अदानी कंपनी’ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का ? असा संतप्त सवाल विचारला.व्हीआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी’ महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाही, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ‘जीवीके’ प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अदानी एअरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.अदानी समुहाने हवाई प्रवास क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठमोठ्या विमानतळांचे संचालन अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी अदानी समुहाकडे सोपवण्यात आली होती. समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी सोशल मीडिया वर ट्विट करुन याविषयी माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here