येवला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

0

येवला : येवला तालुक्यातील सायगाव येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास युवा नेते दयानंद जाधव व प्रभाकर गरुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शशिकांत जगताप, दयानंद जाधव यांनी आपले विचार मांडले  जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव असा जग बदलाचे तत्त्वज्ञान सांगणारे व संयुक्त महाराष्ट्रात पुरोगामी चळवळ उभी करून लोकशाहीर साहित्यरत्न लोक कलावंत अशा उपाधी प्राप्त करून कथा व कादंबऱ्या चे लेखन करत मुंबईसारख्या लेबर कॅम्प या झोपडपट्टीमध्ये राहत असताना लोकांचे जगणे संघर्ष व सुख दुख अण्णाभाउंनी जवळून पाहिल्यानंतर त्यांना लेखनाचे आवड तयार झाली त्यानंतर त्यांनी समशानातील सोनं, फकीरा ,वैजंता अशा अनेक प्रकारे वगनाट्य कथा व कादंबऱ्या लिहीत असताना रशियासारख्या ठिकाणी छत्रपतींचा पोवाडा गाऊन भारताचे नाव समुद्रापार पसरवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांच्या कलेतून पोचवण्याचे काम केल्याचे संजय पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी गीताराम आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले व दगु आव्हाड यांनी आभार मानले यावेळी वंचित चे युवा नेते दयानंद जाधव शशिकांत जगताप ,संजय पगारे ,ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गरुड, तुळशीदास जगताप, विठ्ठल जाधव, सिद्धार्थ वाघ, योगेश पठारे, किरण पठारे हरिभाऊ अहिरे, वसंत घोडेराव आदी मान्यवर उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here