देवणीत रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको आंदोलन

0

मुंबई : जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७: लातुर – देवणी : येथील शहरातून जाणारा प्रमुख रस्ता तोगरीमोड ते वलांडी निलंगा जाणारा रस्ता गेली दोन वर्षापासून खोदून ठेऊन काम पेंडीग ठेवण्यात आले आहे त्यामुळे आनेक अपघात होत आसून सदर रस्ता तात्काळ सुरू करावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने रविवारी (ता.२५) रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.गेल्या दीड वर्षापासून सतत आंदोलन उपोषण करण्यात आले तरी देखील या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी शासन व प्रशासन अद्याप या रोडकडे पाठ फिरवत असल्यामुळे आज गेल्या दीड वर्षापासून जवळपास चारशे ते पाचशे लोकांचा अपघात होऊन हात पाय डोके फॅक्चर झालेले आहेत. सध्या पावसाळा चालू असून रोडची अतिशय दूरावस्था झालेले आहे. म्हणून देवणी शहर व तालुक्याच्या वतीने सदर रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.या वेळी अंदोलनात अशोकअण्णा लुले, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच बाबुरावजी लांडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवने, अमित मानकरी, निलेश लांडगे, योगेश तरगरखेडे, श्रीमंतांना लुल्ले, चेतन मिटकरी, शंकर जीवने, सुनील चिद्रवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मानीक लांडगे, दिनेश महिंद्रकर, आडत व्यापारीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डोंगरे, व तसेच शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.फोटो ओळ:- देवणी : येथील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी रास्तारोको अंदोलनात रस्त्यावर बसलेले सर्व पक्षीय उपस्थित कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here