शेतकऱ्यांना शहर शिवसेनेच्या मध्यस्तीने युरियाचे(खत) वाटप.

0

मनमाड शहर व परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर शेती कामांना सुरवात झाली. शेतकऱ्यांची त्यासाठी बी-बियाणे खरेदी तसेच खत खरेदीची धावपळ सुरू झाली असतानाच युरिया खताचा अपुरा पुरवठा तसेच टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांनी याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार शहर शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून युरिया उपलब्ध करून देण्याविषयी सांगितले असता, दराडे फर्टिलायझर व समर्थ फर्टिलायझर या मार्केट कमिटी जवळील दुकानांमध्ये सुमारे 110 गोण्या युरियाचे वाटप गरजू शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी युरिया घेण्यासाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन आमदार साहेबांचे व समंधितांचे आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जि.संघटक राजाभाऊ भाबड, जि.उपप्रमुख संतोष भाऊ बळीत, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाबभाऊ भाबड, यांच्याहस्ते युरिया गोण्यांचे वाटप करण्यात आले.
युरिया पुरवठा गरजेनुसार वाढवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी तसेच याकामी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खत दुकानदार, कृषी अधिकारी यांच्यासमवेत आमदार साहेबांच्या बैठकीचे नियोजन ही येत्या काळात करण्याचेही शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here