गुंजाळनगर पाणी पुरवठा योजनेसाठी जि. प. सदस्या नुतन आहेर यांचा जागा पाहणी दौरा

0

वासोळ प्रतिनिधी देवळा -दि. (१जुलै) महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या कृती आराखड्यात वाखारी जि. प. गटातील ८ गावांचा समावेश झाला असून त्यात गुंजाळ नगर गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने येथील रहिवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वयित व्हावी यासाठी जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी येथील करला धरणात जागेची पाहणी करण्यासाठी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, अनिलदादा गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, रामराव गुंजाळ, शांताराम गुंजाळ, सतिश गुंजाळ, विनोद आहेर, सतीश गांगुर्डे, बापू जाधव, दीपक जाधव, माजी उपसरपंच सुजाता गुंजाळ, ग्रा.पं. सदस्य डॉ. राजेंद्र गुंजाळ, केदा वाघ, छोटू साबळे, ग्राम विस्तार अधिकारी वैभव निकम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here